Business Loan:- समाजातील आर्थिक दुर्बल घटक तसेच महिला, छोटे मोठे विक्रेते, शेतकऱ्यांनी शेतमजुरांसाठी देखील राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. अशा योजनांच्या मदतीने अनुदान किंवा कर्ज स्वरूपात आर्थिक मदत करून स्वतःचा व्यवसाय उभा करता यावा व असे व्यक्ती आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे हा त्यामागचा शासनाचा दृष्टिकोन आहे.
तसेच काही योजनांच्या माध्यमातून कमीत कमी व्याजदरामध्ये कर्ज पुरवठा देखील या माध्यमातून केला जातो. याच पद्धतीने जर आपण दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या योजनांचा विचार केला तर त्यांच्याकरिता देखील राज्य व केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जात असतात व या योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारचे लाभ त्यांना दिले जातात.
दिव्यांग बांधव हे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावेत व अशा युवकांच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक मदतीच्या साह्याने त्यांनी व्यवसाय उभारून त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या योजना खूप महत्वपूर्ण आहेत.
दिव्यांग बंधूंना दोन ते नऊ टक्के व्याजदराने मिळते पाच लाखापर्यंत कर्ज
यामध्ये राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून वैयक्तिक थेट कर्ज योजना व दीर्घ मुदतीच्या कर्ज योजना अशा दोन प्रकारच्या योजना प्रामुख्याने राबविण्यात येत असून यामध्ये वैयक्तिक थेट कर्ज योजनेच्या माध्यमातून दोन टक्के व्याजदराने 50 हजार ते वार्षिक पाच ते नऊ टक्के व्याजदर आणि पाच लाखापर्यंत कर्ज दिले जाते.
राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींकरिता या योजना राबवल्या जात असून अनेक प्रकारचे लाभ देखील या योजनांच्या माध्यमातून दिले जात आहेत.या योजनांच्या साहाय्याने त्यांना विविध व्यवसाय उभा करता यावेत व त्यांना उदरनिर्वाहाचे व अर्थार्जनाच्या साधने निर्माण व्हावेत हा त्यामागचा उद्देश आहे व त्याकरिता राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळाकडून योजना राबवण्यात येते.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी कुठे करावा लागेल अर्ज?
जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संकेतस्थळ अर्थात वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज उपलब्ध असून त्यानंतरची प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करणे गरजेचे असते.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी कुठली कागदपत्रे लागतात?
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अपंगत्व प्रमाणपत्र, पंधरा वर्षे वास्तव्याचे प्रमाणपत्र, टीसी किंवा अशिक्षित असल्यास तसे प्रमाणपत्र, यूडी आयडी कार्ड, आधार व पॅन कार्ड, मतदार कार्ड, रेशन कार्ड, चार पासपोर्ट साईज फोटो, व्यवसायासाठी जागेचा पुरावा, इतर कुणाकडून कर्ज न घेतल्याची शपथपत्र, कोटेशन, एक्सपिरीयन्स सर्टिफिकेट( असल्यास), शॉप ॲक्ट लायसन, प्रोजेक्ट रिपोर्ट ही महत्वाची कागदपत्रे लागतात.
कोणकोणत्या व्यवसायासाठी मिळते कर्ज?
महत्वाचे म्हणजे अर्जदार कोणत्याही व्यवसायाकरिता या माध्यमातून कर्ज घेऊ शकतो. यामध्ये व्यवसायाचे कुठल्याही प्रकारचे बंधन नाही. या योजनांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना 50 हजार ते पाच लाखापर्यंत कर्ज मिळते. यामध्ये वैयक्तिक थेट कर्ज योजनेअंतर्गत जर कर्ज घ्यायचे असेल तर 50 हजार रुपये मिळतात
तर दीर्घ मुदतीच्या कर्ज योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांचे कर्ज मिळते. वर्षाला दोन टक्के व्याजदर आकारला जातो. म्हणजेच 50 हजाराचे कर्ज घेतले तर दोन टक्के व पाच लाखांची कर्ज घेतले तर पाच ते नऊ टक्के इतका व्याजदर लागत असतो.