महाराष्ट्र

अवकाळी पावसाची शक्यता ! रब्बी हंगामातील पिकं धोक्यात; १६ जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा संकटात

पुणे : हिवाळा ऋतू (Winter season) सरून आता उन्हाळा चालू झाला आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात हवामानात (weather) वेगवेगळे बदल होत असून लवकरच १६ जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

यामुळे हवामान खात्याने (IMD) आज पुण्यासह (Pune) सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, बीड, हिंगोली, अहमदनगर, औरंगाबाद आणि जालना या 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे.

त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये (farmer) चिंतेचे वातावरण असून रब्बी पिके काढणीला आली आहेत. मात्र ही पिके निघण्याआधीच पाऊस (Rain) आला तर हातातोंडाशी आलेला घास हिसकावला जाऊ शकतो,त्यामुळे हे आस्मानी संकट आता उभे आहे.

दरम्यान, मागील तीन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस कोसळला आहे. दरम्यान तुरळक ठिकाणी गारपीट (hailstorm) देखील झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.

आज कोकण, घाट परिसर, आणि लगतच्या मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही तासांत याठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts