अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- pगेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या अचानक वाढू लागली आहे. दिवसाला १० -१२ हजार नवे करोनाबाधित आढळून येऊ लागल्याने प्रशासन सतर्क झालं आहे.
अशातच राज्यातले मंत्री आणि अनेक प्रमुख नेत्यांनाही करोनाची बाधा झाली आहे. चला तर मग आज आपण अशाच काही नेत्यांची नाव जाणून घेऊ ज्यांना सध्या कोरोनाची बाधा झाली आहे..
एकनाथ शिंदे – राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतीच करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ट्वीट करत याबद्दल सांगितलं आहे. याआधीही ते कोरोनाबाधित झाले होते.
वर्ष गायकवाड – राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटी करोनाची लागण झाली. त्याही सध्या विलगीकरणात आहेत.
बाळासाहेब थोरात – राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात देखील सध्या करोनाबाधित आहेत. सुप्रिया सुळे – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही करोनाची लागण झाली आहे.
रोहित पवार – राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत – जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनाही करोनाची लागण झाली आहे.
पंकजा मुंडे – भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनाही करोनाची लागण झाली असून त्यांना करोनाचा नवा विषाणूप्रकार ओमायक्रॉनची लागण झाली आहे.
यशोमती ठाकूर – राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचा करोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
राधाकृष्ण विखे – भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही करोना झाला आहे.
सुजय विखे – भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनाही करोनाची लागण झाली आहे.
हर्षवर्धन पाटील – भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांना करोनाची लागण झाली. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी अंकिता पाटील ही देखील करोनाबाधित आहे.
अतुल भातखळकर – भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.