Cidco Lottery News:- प्रत्येकाला स्वतःचे घर असावे व ते ही मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये हे स्वप्न असते. परंतु सध्याच्या महागाईच्या कालावधीमध्ये घर घेणे किंवा प्लॉट घेऊन घर बांधणे हे आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे नाही. कारण या महागाईच्या कालावधीत बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमतीमुळे मुंबई आणि पुण्यासारख्या आणि इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये घरांच्या किमती या सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक आवाक्या पलीकडे गेलेले आहेत.
अशा परिस्थितीमध्ये नागरिकांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सिडको आणि म्हाडा हे अनेक योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. यामध्ये जर आपण सिडको चा विचार केला तर सिडकोच्या माध्यमातून देखील गृहनिर्माण योजना राबवल्या जातात व या माध्यमातून बऱ्याच नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सिडकोची भूमिका देखील महत्वपूर्ण आहे. यात सिडकोच्या बाबतीत एक महत्त्वाची अपडेट समोर आली असून ती नक्कीच नागरिकांचे फायद्याचे आहे.
नवी मुंबई येथील घरांच्या किमती सहा लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी-2022 मधील बामण डोंगरी तसेच नवी मुंबई व उलवे येथील घरांच्या किमती आता सहा लाख रुपयांनी कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिलेले आहेत.
त्यामुळे आता सिडको महामंडळाकडून या ठिकाणच्या घरांच्या किमती कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने आता 35 लाख तीस हजार रुपये किमतीचे जे काही घर असेल ते आता 29 लाख 50 हजार रुपयांमध्ये मिळणार आहे. त्यातल्या त्यात जर आपण पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जे सिडको लॉटरीमध्ये अर्जदार यशस्वी ठरलेले आहेत त्यांना दोन लाख 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे व अशा अर्जदारांना आता ही घरे केवळ 27 लाख रुपये किमतीला मिळणार आहेत.
यामध्ये जर आपण सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी 2022 मधील उलवे आणि बामणडोंगरी या ठिकाणचे जे काही यशस्वी अर्जदार आहेत ते प्रामुख्याने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असून व त्यातल्या त्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत उत्पन्न मर्यादा आहे ती तीन लाख रुपयांपर्यंत असल्यामुळे अशा घरांसाठी 35 लाख रुपयांची रक्कम उभी करण्याकरिता अर्जदारांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता.
या अनुषंगाने अर्जदारांना दिलासा मिळावा म्हणून बामण डोंगरी येथील सदनिकांच्या किमती कमी करण्याचे निर्देश सिडकोला देण्यात आलेले होते व आता त्यानुसार या किमती सहा लाख रुपयांनी कमी करण्यात आल्या असून पीएम आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपये मिळणाऱ्या अनुदानासोबतच यशस्वी अर्जदारांना या सदनिका सत्तावीस लाख रुपये किमतीला मिळणार आहेत.
या योजनेत किती अर्जदार विजेते ठरले होते?
सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी 2022 ही प्रामुख्याने सिडको महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील अर्जदारांकरीता राबवण्यात आलेली होती व त्यानुसार 17 फेब्रुवारी 2023 ला योजनेची संगणकीय सोडत देखील काढण्यात आलेली होती. या योजनेमध्ये 4869 अर्जदार बामण डोंगरी येथील गृहप्रकल्पासाठी विजेते ठरले होते. या योजनेतील जे काही यशस्वी अर्जदार आहेत
त्यांना इरादा पत्र देखील पाठवण्यात आलेली असून त्यानुसार अर्जदारांनी जे काही कागदपत्रे सादर केलेले आहेत त्या कागदपत्रांची पडताळणी आणि वाटप पत्र इत्यादी प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे आता यामध्ये जे अर्जदार यशस्वी ठरलेले आहे त्यांना लवकरच घराचा ताबा मिळेल अशी देखील महत्त्वाची माहिती सिडकोच्या माध्यमातून देण्यात आली आहे.