Cidco Lottery:- मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये आपले स्वतःचे घर असावे हे स्वप्न प्रत्येक जण उराशी बाळगून असते. परंतु वाढत्या महागाईच्या कालावधीत प्रत्येकालाच घर घेणे शक्य होत नाही. परंतु अशा नागरिकांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे म्हाडा आणि सिडको सारखे गृहनिर्माण संस्थाच्या माध्यमातून करण्यात येते.
आपल्याला माहित आहेस की म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून अशा घरांसाठी लॉटरी काढण्यात येते व यामध्ये नाव आलेल्यांना घराचा लाभ दिला जातो. अगदी याच पद्धतीने जर आपण मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांना जोडणाऱ्या अटल सेतू आता झाल्यामुळे
त्या ठिकाणी द्रोणागिरीचे महत्व वाढले असून या ठिकाणी आता सिडको महामंडळाच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनी आधुनिक आणि नियोजित वसाहतींमध्ये घर खरेदी करता येईल अशी संधी सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिली आहे. यासंबंधीचे महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
सिडको महामंडळाने केली 3322 सदनिकांच्या सोडतीची घोषणा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिडको महामंडळाच्या माध्यमातून तळोजा आणि द्रोणागिरी या ठिकाणी असलेल्या तीन हजार तीनशे बावीस सदनिकांच्या सोडतीसाठी ची घोषणा केली असून जे इच्छुक व्यक्तींना याकरिता अर्ज करायचा असेल ते 30 जानेवारी ते 27 मार्च या दरम्यान अर्ज करू शकणार आहेत.
द्रोनागिरी सेक्टर 11 व 12 या परिसरात लाभार्थ्यांना 22 ते 30 लाख रुपयांपर्यंत सदनिका घेण्याची एक सुवर्णसंधी यामुळे मिळाली आहे. जर आपण या सोडतीमध्ये प्रवर्गनिहाय पाहिले तर आर्थिक दुर्बल घटकांकरिता 25.81 चौरस मीटरची सदनिका ही 22 लाख 18 हजार रुपयांमध्ये तर 29.82 चौरस मीटरची सदनिका सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 30 लाख 17 हजारांना मिळणार आहे.
यामध्ये तळोजा नोडचा विचार केला तर सेक्टर 21, 22, 27, 34, 36 आणि 37 या परिसरामध्ये ज्या काही सदनिका आहेत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या सदनिकांचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्वसाधारण प्रवर्ग आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक याकरिता राखीव आहेत.
साधारणपणे सोडती मध्ये या सदनिका लाभार्थ्यांना 22 ते 34 लाख रुपयांच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थी पाहिले तर अशा उमेदवारांना यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून दीड आणि राज्य शासनाच्या माध्यमातून एक असे अडीच लाख रुपयांचे अनुदान या सोडत योजनेमध्ये मिळणार आहे.