महाराष्ट्र

Good News : धोकादायक चाळीतील नागरिकांना मिळणार मोफत घरे ?

Good News : समतानगर येथील विविध भागांतील धोकादायक चाळीचे पनर्वसन करण्यासंदर्भात गुरुवारी ठाणे महापालिका मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार प्रताप सरनाईक आणि आयुक्त अभिजीत बांगर हे दोघेही या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत येथील नागरिकांना मोफत घरे देण्याची मागणी सरनाईक यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. यावर आयुक्तांनी एक आठवड्याच्या आत क्रिसिल या कन्सल्टन्ट कंपनीची नेमणूक करून नकाशा व अंदाजपत्रकासह सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले.

गरज पडल्यास या प्रकल्पासाठी राज्य शासनाची मदत घेऊ, अशी भूमिका बांगर यांनी घेतली आहे. या बैठकीमध्ये राज्य शासनाच्या नियमानुसार ३२३ स्क्वे फूट कारपेटची घरे या परिसरातील सुमारे ४५० रहिवाशांना मोफत देऊन त्यांचे पुर्नवसन करावे,

अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्त अभिजीत बांगर यांनी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये हा प्रकल्प जर महानगरपालिकेने करण्याचा ठरवला तर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नाही.

तसेच हा प्रकल्प अत्यंत खर्चिक असल्याने तो पी.पी.पी. तत्त्वावर करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. परंतु, घरांची संख्या शासनाच्या स्तरावरही काही मदत घेऊन प्रकल्प पुढे कसा नेता येईल यासंदर्भात देखील विचारविनिमय करण्यात आला.

असे आयुक्त बांगर यांनी सांगितले. गेल्याच आठवड्यात राजीव गांधी नगरमधील पहिला माळा असलेल्या चाळीचा भाग कोसळल्यामुळे दुर्घटना घडली. त्यावेळी नशिबाने नागरिकांचा जीव वाचला. अशा घटना वारंवार घडू नये यासाठी महानगरपालिकेने त्वरित उपाययोजना करावी,

अशी विनंती आमदार सरनाईक यांनी केली. याप्रसंगी महानगरपालिकेचे उपनगर अभियंता नितीन येसूगडे, कार्यकारी अभियंता शैलेश बेंडाळे, कार्यकारी अभियंता मोहन कलाल यांच्यासह क्रिसिल या संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.

शहराचा चेहरामोहरा बदलला

समतानगरमधील राजीव गांधी नगर, आनंदराम नगर, मिलिंद हाऊसिंग सोसायटी तसेच लोकमान्यनगरमधील सिद्धिविनायक सोसायटी या परिसरातील सर्व रहिवाशांनी सन १९९७ साली ठाणे महानगरपालिकेच्या रस्ता रुदीकरणासाठी स्वत:च्या घरांची जागा उपलब्ध करून दिली होती.

त्यामुळेच या ठाणे शहराचा चेहरामोहरा बदलेला आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे या सर्वसामान्य लोकांना जास्तीत जास्त सहकार्य महानगरपालिकेने करावे, अशी भूमिका आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts