अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- वाढीव वीजबिले, वीज पुरवठा खंडित होणे, आदी समस्येने नागरिक वैतागले आहे, मात्र नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत आपला मनमानी कारभार सुरु ठेवण्याचे काम शेवगाव तालुक्यातील महावितरण करत आहे.
शेवगाव शहरातील अधिकारी हे बहुतांश वेळा कार्यालयात उपस्थितच नसतात. आपल्या समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना भेटण्यासाठी महावितरणच्या साहेबांना वेळ नसतो.
अधिकारी आपला मनमानी करत असल्याच्या अनेक घटना याआधीही वरिष्ठांच्या कानी घातल्या आहे. मात्र अशी कामचुकार अधिकारी ऐकतील तर खरं…
वीजबिले वसुलीसाठी पथकाची नेमणूक करणारे महावितरणचे अधिकारी वीजग्राहकांच्या समस्येंकडे साफ दुर्लक्ष करत आहे. सध्या महावितरणकडून शहरासह तालुक्यात तासंतास अघोषित भारनियमन सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून महावितरणच्या उपकेंद्राचा संपर्क क्रमांक बंद आहे. तर कर्मचारी अथवा अधिकार्यांना संपर्क केल्यास ते उडवाउडवीची उत्तरे देतात.
यावरुन कधी जुन्या शेवगावात तर कधी उपनगरात कायम वीज गायब असल्याचे दिसते. या अघोषित भारनियमनामुळे अनेक व्यापारी, गृहिणी यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.
येथील कामचुकार अधिकारी नागरिकांच्या विजेच्या तक्रारी सोडविणार नाही मात्र वीजबिल वसुलीसाठी सर्वात प्रथम असतात. दरम्यान शेवगाव महावितरणच्या या मनमानी कारभारामुळे शहरातील नागरिक संतापले आहे.
काहीदिवसांपूर्वी शेतकरी संघटना, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि मनसे यांनी वाढीव वीज बिलांच्या विरोधात आंदोलने केली होती.
मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. महावितरणच्या या भोंगळ कारभाराला जनता पुरती वैतागली असून आंदोलनाचा पावित्र्यात आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved