अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदांच्या निवडीत अजित पवार यांनी दिलेला आदेश डावलल्याने माजी नगरसेवक संजय घुले यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे.
हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये ट्रकने महिलेला चिरडले !
राष्ट्रवादीच्या स्वीकृत नगरसेवकपदांच्या दोन नावांपैकी एक नाव माजी नगरसेवक संजय घुले यांचे करावे व दुसरे तुम्हाला पाहिजे ते करावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते,
हे पण वाचा :- किरकोळ वादातून जन्मदात्या आईची हत्या, मृतदेहाचे तीन तुकडे करून साजरा केला थर्टी फस्ट !
मात्र अजित दादा यांच्या त्या आदेशाला आमदार संग्राम जगताप यांनी केराची टोपली दाखवल्याने घुले आ. संग्राम जगताप यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तक्रार करणार आहे.
हे पण वाचा :- ब्रेकिंग न्यूज : अहमदनगर शहरात राजकीय भूकंप !
महापालिकेच्या मागील ५ वर्षांच्या काळात घुले राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक होते. यंदाही या पदावर काम करण्याची त्यांची इच्छा होती. पण पक्षाने बाबा गाडळकर व विपुल शेटिया यांच्या नावांचे प्रस्ताव दिले होते.
हे पण वाचा :- पुण्याच्या तरुणाने अहमदनगरमधून व्यापाऱ्याच्या मुलीस पळविले
दरम्यान महापालिका आयुक्त-जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे दोन्ही प्रस्ताव अमान्य केले व त्यावर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शिक्कामोर्तब केल्याने शुक्रवारी या निवडी जाहीर होऊ शकल्या नाहीत.
हे पण वाचा :- हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश …बॉलिवूड अभिनेत्रींना अटक !
घुले म्हणाले, आमदार जगताप पिता-पुत्रांनी माझे नाव डावलले.‘ ते शहराचे आमदार आहेत. पूर्ण शहरात डॉक्टर, इंजिनीअर, कॉन्ट्रॅक्टर, प्राध्यापक, अल्पसंख्याक, धनगर, मागासवर्गीय, मुस्लिम, ब्राह्मण अशा अनेक छोट्या-मोठ्या समाजाने त्यांना विधानसभेला भरभरून मदत केली आहे.
हे पण वाचा :- डोळ्यांना दिसतील अशीच कामे करायचीत रोहित पवारांची राम शिंदे यांच्यावर टीका !
त्या समाजाच्या प्रमुखांना आपण स्वीकृत नगरसेवक करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यामुळे झालेल्या सर्व घडामोडींची माहिती अजित पवार यांना समक्ष भेटून तक्रार करणार आहे’, असेही घुलेंनी जगतापांवर टीका करणाऱ्या या निवेदनात सांगितले आहे.
हे पण वाचा :- महिलेला झाले तिच्या ड्रायव्हरवर प्रेम, मुलांसमोरच केला ड्रायव्हरसोबत सेक्स !