अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर महापालिका क्षेत्रात आणखी १ कंन्टेन्मेंट झोन वाढला असून बागरोजा सावेडी भागातील पंकज कॉलनी परिसरामध्ये कोरोना विषाणची बाधा झालेले रुग्ण आढळून आलेले आहेत.
त्यामुळे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी हा परिसर २९ जुलै पर्यंत कंन्टेन्मेंट झोन तर त्या भोवतालचा परिसर बफर झोन जाहीर केला आहे.
सावेडी भागातील पंकज कॉलनी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने या क्षेत्रातून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी या भागात कंन्टेन्मेंट व बफर झोन गुरुवारी (दि.१६) दुपारी २ वाजेपासून ते २९ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत राहणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी जाहीर केले आहे.
कंन्टेन्मेंट झोन – पंकज कॉलनी, मुख्य रस्त्यावरील ग्रीन प्लेनेट नसरी श्री.येरी यांचे घर श्री.माखीजा यांचे घर,रेखा गोविंद निवास,श्री.चोळके यांचे घर ते ग्रीन प्लेनेट नसरी.
बफर झोन – गंगा उदयान व खुली जागा, मिस्कीन मळा वसाहत, आशा होसींग सोसायटी, समतानगर, राज्य कर्मचारी सोसायटी, जिजामाता व बालाजी कॉलनी, सिक्यूएव्ही चे पश्चीमेकडील परिसर.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews