अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आजही काेराेनाबाधितांचा आकडा वाढला आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 692 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. त्यात नगर शहरात 220 रुग्णांचा समावेश आहे.
अहमदनगर शहर 220, राहाता 75, संगमनेर 66, श्रीरामपूर 55, नेवासे 48, नगर तालुका 47, पाथर्डी 35, अकाेले 28, काेपरगाव 28,
कर्जत 18, पारनेर 16, राहुरी 14, भिंगार शहर 11, शेवगाव 10, जामखेड 06, श्रीगाेंदे 06 आणि इतर जिल्ह्यातील 09 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.
जिल्हा रुग्णालयानुसार 168, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 361 आणि रॅपिड चाचणीमध्ये 163 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले आहे.