अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- राज्यात लस घेणं बंधनकारक नाही, मात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी लस घेणे नागरिकांना भाग पाडू. राज्यात लसीकरण समाधानकारक असून,
लसीची सक्ती नसली तरी आम्ही नागरिकांना विनंती करू, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात कोरोना लसीचे दोनही डोस घेणे आवश्यक असल्याची स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
दिली.कोरोना लस सक्तीची नसल्याचं केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि राज्य सरकार आमने-सामने आलं आहे.
लोकांनी नियम पाळल्यास राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येईल आणि राज्यात लागू केलेले निर्बंध मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून कमी करण्यात येतील.
असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.राज्यात लस घेणं सक्तीचं नाही मात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी लस घेणं त्यांना भाग पाडू असं सांगत सध्या लता मंगेशकर यांची तब्बेत स्थिर असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली.