CRPF Recruitment : जर तुम्ही सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर आता ही संधी तुमच्यासाठी आलेली आहे. कारण CRPF मध्ये लाखो पदांसाठी भरती निघाली आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) 1.30 लाख कॉन्स्टेबलची भरती केली जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. CRPF द्वारे एकूण 1,29,929 पदांची नियुक्ती केली जाईल. त्यापैकी 1,25,262 पदे पुरुषांसाठी आहेत.
तर 4667 पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहेत. यासह, माजी अग्निवीरांसाठी 10% रिक्त जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी जर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही अर्ज करू शकता.
जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाइट crpf.gov.in ला भेट देऊ शकतात. या साइटद्वारे तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता.
10वी पास अर्ज
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे. त्यांनी मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक उत्तीर्ण केलेले असावे. तसेच यासाठी 18 ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही भरती लेव्हल-3 अंतर्गत केली जाईल. ज्या तरुणांची निवड केली जाईल. त्यांना 21,700 रुपये ते 69,100 रुपये प्रति महिना पगार दिला जाईल. अधिसूचनेनुसार, ही भरती फक्त कॉन्स्टेबलसाठी केली जाईल.
यासाठी भारतीय नागरिक अर्ज करू शकतात. यामध्ये नेपाळ आणि भूतानच्या लोकांना प्राधान्य दिले जाणार नाही. या भरतीमध्ये SC-ST उमेदवारांना 5 वर्षे आणि OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट दिली जाईल.
निवड कशी होईल?
या पदांसाठी उमेदवारांची निवड शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखी चाचणीद्वारे केली जाईल. परीक्षेच्या पुढील टप्प्यांसाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांनी शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. ते या दोन परीक्षा कधी पास होतील. त्यानंतरच तुम्ही परीक्षेच्या पुढील टप्प्यात बसू शकाल.