अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी ;- तालुक्यातील पश्चिम डोंगराळ दुर्गम भागातील कोळेवाडी येथील शिवाजी तुकाराम घोडे (वय 40) यांचे दारू पिल्याने म्हैसगाव बाजारपेठेतच निधन झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी करीत राहुरी पोलिसांचा निषेध केला.
हे पण वाचा :- वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले असे काही…
घोडे हे मंगळवारी आठवडे बाजारामध्ये पेठेत म्हैसगाव- राहुरी रस्त्याच्याकडेला मृतावस्थेत आढळून येताच म्हैसगावतील ग्रामस्थांनी राहुरी पोलिसांशी संपर्क केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविला.
हे पण वाचा :- या कारणामुळे प्राजक्त तनपुरे झाले मंत्री खुद्द शरद पवारांनीच दिले स्पष्टीकरण !
मात्र, एका आदिवासी तरुणाचा दारू पिल्याने मृत्यू होऊनही दोन दिवस झाले तरी राहुरी पोलिसांनी अवैध दारूविक्री करणारांवर काहीही कारवाई केली नाही. या घटनेमुळे संतप्त झालेल्या म्हैसगाव, कोळेवाडी येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको करून राहुरी पोलिसांचा निषेध करीत म्हैसगाव बाजारतळावर निषेध सभा घेऊन अवैध दारू दुकाने बंद झाली पाहिजेत न केल्यास परिसरातून महिला व नागरिकांचा राहुरी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल.
हे पण वाचा :- राष्ट्रवादीचा हा नेता होणार अहमदनगरचा पालकमंत्री ?
अन्यथा वरिष्ठ पातळीवर या परिसरातील पोलीस खात्याबद्दलची संपूर्ण अवैध धंद्याबद्दलची माहिती सामूहिक तक्रार अर्जाद्वारे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हैसगाव परिसरातील अवैध दारू विक्रीतून मोठे रॅकेट सक्रिय असून या ठिकाणी बाहेरून अवैध दारूचा पुरवठा करणारे व विक्री करणार्यांचे राहुरी पोलिसांशी अर्थपूर्ण संबंधामुळे अवैध दारू विक्रेते मगरूर झाले आहेत.
हे पण वाचा :- आमदार निलेश लंके म्हणाले मंत्रिपदापेक्षा ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची !
अनेक वेळा ग्रामस्थांनी दारूबंदीचे ग्रामसभेद्वारे बहुमताने ठराव मंजूर करून अवैध दारू विक्री बंद झाली पाहिजे म्हणून प्रयत्न केले. मात्र, अवैध दारूविक्री बंद झाली नाही. उलट या व्यवसायाने गावात मारामार्या, भांडणे होऊन शांततेचा भंग झाला आहे. या प्रकाराने ग्रामस्थ त्रस्त होऊन आता अवैध दारू धंद्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
हे पण वाचा :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक सरपंचाचे पद अखेर रद्द