महाराष्ट्र

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! आता ‘या’ शेतकऱ्यांची केली कर्जमाफी; महिन्याअखेरपर्यंत 200 कोटींची कर्जमाफी

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Maharashtra news :- महिन्यापूर्वी केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात शेतकरी बांधवांसाठी झुकते माप ठेवले होते. याच धर्तीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aaghadi Government) देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय अर्थसंकल्पात बोलून दाखवलेत. अनेक योजनांची घोषणा देखील यावेळी करण्यात आली आहे.

अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्प (Budget) सादर करताना सांगितले होते की, शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ देखील दिला जाणार आहे. या अनुषंगाने आता महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजनेच्या (Mahatma Phule Farmers Debt Waiver Scheme) उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे.

विशेष म्हणजे महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील जवळपास 54 हजार पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी राहिलेली आहे, आणि या एवढ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षापासून प्रलंबित आहे.

त्यामुळे या मुद्द्यावर वारंवार राजकारण ढवळून निघते, मात्र आता या मुद्द्यावर होत असलेले राजकारण लवकरच थांबेल. कारण की, महाविकास आघाडी सरकारने या योजनेच्या 54 हजार शेतकऱ्यांची 200 कोटींची कर्जमाफी 31 मार्च अखेरपर्यंत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आता घेतला आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाविकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर माननीय उद्धवजी ठाकरे (Uddhavji Thackeray) यांना राज्याचे मुख्यमंत्री पदावर विराजमान केले. सत्ता स्थापन झाल्यानंतर ठाकरे सरकारने दिलेल्या वचनानुसार कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

ठाकरे सरकारने दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत 31 लाख 73 हजार शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देखील करण्यात आली. मात्र मध्यंतरी कोरोना आल्याने शासनाच्या तिजोरीत खळखळाट निर्माण झाला होता म्हणून उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येणे त्यावेळी शक्य नव्हते.

तेव्हापासून उर्वरित 54 हजार शेतकऱ्यांची दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी रखडली ती रखडलीचं. या उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा नेहमीच ऐरणीवर येत असायचा यामुळे महाविकास आघाडी सरकारवर अनेक आलोचना देखील होऊ लागल्या.

या मुद्द्यावर नुकत्याच काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षाच्या आमदारांनी तीव्र निषेध व्यक्त करत विधानसभेवर बहिष्कार घालू असे संकेत दिले होते. यादरम्यान, आता महाविकास आघाडी सरकारने हा मुद्दाच निकाली काढून टाकल्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर राजकारण थांबेल हे नक्की.

महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजनेच्या उर्वरित 54 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी 31 मार्च अखेरपर्यंत केली जाणार असून या शेतकऱ्यांच्या खात्यावरचा कर्जाचा बोजा आता कमी होणार आहे. यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts