अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला असून, यासाठी पक्षाचे सर्व नेते एकत्र आहेत.
अध्यक्षपदाचा उमेदवार कोण हे अर्ज दाखल करताना ३१ डिसेंबरला कळेल, असे पक्षाचे नेते आ. राधाकृष्ण विखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
विधानसभा निवडणुकीनंतर माजी मंत्री राम शिंदे, माजी आ. शिवाजी कर्डिले यांनी आपल्या पराभवास विखे जबाबदार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर काल मुंबईत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थतीत बैठक झाली.
त्यानंतर याच बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ३१ डिसेंबरला होणार्या निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी सर्वाधिकार आ. विखे पाटील आणि माजी मंत्री राम शिंदे यांना देण्यात आले.
त्या पार्श्वभूमीवर येथील विश्रामगृहावर पक्षाच्या जिल्ह्यातील कोअर कमिटीची बैठक आज झाली.
बैठकीस विखे, शिंदे, कर्डिले यांच्यासोबतत आ. मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, नितीन कापसे उपस्थितत होते.