मुलीवर अत्याचार करुन खून करणार्‍या आरोपींना फाशी देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-  लहुजी शक्ती सेनेच्या वतीने बिलोली (जि. नांदेड) येथील मातंग समाजातील मुकबधीर मुलीचे बलात्कार करून तीचा निर्घुणपणे खून करणार्‍या

आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची व महाराष्ट्रात त्वरीत महिलांच्या सुरक्षिततेसाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.

सदर मागणीचे निवेदन लहूजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिले. दि. 9 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील झोपडपट्टी राहत असलेल्या 27 वर्षीय अनाथ आणि मुकबधीर मुलीवर बलात्कार करून, तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.

पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, तसेच महाराष्ट्रात महिलांवर वाढते अत्याचार रोखण्यासाठी त्वरीत शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts