अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या रखडलेल्या नियुक्त्यांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या सदस्यत्वासाठी राष्ट्रीय काँग्रस पक्षाने युवक प्रतिनिधी म्हणून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांना संधी देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या मागणीबाबतचे पत्र पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींना पाठवण्यात आले आहे. या पत्रात म्हंटले आहे कि, काँग्रेस पक्षाला जेव्हा महाराष्ट्रातील मोठ मोठे नेते पक्ष सोडून जात होते तेव्हा सत्यजीत तांबेनी महाराष्ट्र भर दौरा केल्या मुळे मोठ्या संख्येने युवक आणि युवती काँग्रेस पक्षाकडे आकर्षित झाले.
कोरोना संकटाच्या काळात सत्यजीत तांबेनी राज्यात जेव्हा रक्ताचा तुटवडा जाणवला त्यावेळी त्यांनी युवक काँग्रेसच्या मध्यामतून २५ हजारच्या पुढे रक्त बॅग पूर्ण राज्यातून गोळा केल्या.
तसेंस लॉक डाऊन काळात गरुजूंना किराणा, अन्नधान्य, मास्क याचे वितरण युवक काँग्रेस मार्फत केलं. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सत्यजीत तांबे यांना राज्यपाल नियुक्त आमदार पदावर वर्णी लावावी अशी जिल्ह्यातील सर्व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे पक्षाकडे मागणी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved