महाराष्ट्र

Maratha Reservation : गुणरत्न सदावर्तेना दोन महिने स्थानबद्ध करण्याची मागणी

Maratha Reservation : महाराष्ट्रात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज व गोळीबाराचा निर्दयी प्रकार घडला आणि तरी देखील मराठा समाजाने शांतता बाळगली.

ज्यांची वकिलीची सनद जप्त झाली होती असे समाजात तेढ निर्माण करणारे गुणरत्न सदावर्ते त्यांनी मराठा आंदोलकांवर गरळ ओकली.

सदावर्ते यावरच थांबले नाहीत त्यांनी भारतातील सर्वाधिक मोठी आणि शिस्तबद्ध झालेली मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला सुध्दा विरोध केला.

सोबतच मराठा समाजाची बदनामी होईल असे वक्तव्य केले. एकंदरीतच मराठा समाजाविषयी विकृत मानसिकता असलेल्या सदावर्ते यांना

दोन महिने स्थानबध्द करण्याची मागणी स्मायलिंग अस्मितचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी मुख्यमंत्री एकनाथशिंदे यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे.

श्री. तोडमल यांनी या निवेदनात म्हटले आहे की, आधीच विविध संकटांमुळे पिचलेल्या मराठा तरुणांना उचकवत आहे.

सध्या महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत की नाही असाही प्रश्न उपस्थित होतोय. हे सदावर्ते फक्त मराठा आरक्षण विषय ऐरणीवर आला की गरळ ओकत मराठा समाजाविषयी असलेला व्देश व्यक्त करत आहेत.

ते असे का करतात की त्यांना कुणी असे करायला सांगत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही की त्यांना अटक झाली नाही,

असे विविध प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्रात शांतता राखण्यासाठी दोन महिने स्थानबद्ध करण्यात यावे, असे त्यांनी म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts