त्या’निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावरून विरोधकांनी राष्ट्रवादीला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

त्याचबरोबर विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच इतके क्रिमिनल मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात असल्याचा टोला भाजप नेते निलेश राणे यांनी लगावला होता.

यावर आता अजित पवार म्हणाले की, ते काही बोलतात आणि मी त्यावर बोलायचे का? पण एक सांगतो, त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचे म्हणत अजित पवार यांनी निलेश राणेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशाने पोलिसांवरील विश्वास उडेल लोकांचा.

सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं. त्याचबरोबर नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावर झालेल्या कारवाईचे श्रेय निलेश राणे यांनी यावेळी नरेंद्र मोदींना दिले आहे.

मोदी साहेबांमुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंटमुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेल्याचे राणे यांनी आपल्या दूसऱ्या ट्विटमध्ये म्हटले.

तर राष्ट्रवादीत चाललंय काय?? इतके क्रिमिनल मिळून एका जेलमध्ये नसतील तितके एका पक्षात असल्याचा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts