महाराष्ट्र

Devendra Fadnavis : ब्रेकिंग! महिलांसाठी देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा! आता एसटी प्रवासात 50 टक्के सूट

Devendra Fadnavis : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये खासकरून महिलांसाठी राज्य परिवहन मंडळाच्या प्रवासात महिलांना तब्बल ५० टक्के सूट देण्यात आली आहे. यामुळे महिलांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

यामध्ये राज्यांतर्गत प्रवास करताना महिलांना फक्त निम्मे तिकिट द्यावे लागणार आहे. राज्यात लवकरच सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार तसेच महिलांच्या सुरक्षित आणि सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यंटन धोरण तयार कऱणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केला. या अर्थसंकल्पाकडे राज्याचे लक्ष लागले होते.

शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांकरिता केंद्र सरकारच्या मदतीने ५० वसतीगृह स्थापन करणार असल्याची घोषणाही अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामुळे महिलांना मोठा फायदा होणार आहे.

तसेच अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना राबवणार.

यामध्ये पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा देणार. या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार, असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये करणार, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. यामुळे याचा फायदा होणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts