महाराष्ट्र

Devendra Fadnavis : फडणवीसांनी घोषणा केलीय हाफ तिकीट हाय, महिलेने हुज्जत घालत एसटीत घातला धिंगाणा

Devendra Fadnavis : सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी बसमध्ये महिलांना हाफ तिकीट करणार असल्याची घोषणा केली. यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असताना शिंदे फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेचा एका एसटी वाहकाला चांगलाच फटका बसला आहे.

याचे कारण म्हणजे महिलेला आता अर्ध तिकीट हाय म्हणत महिलेने एसटी वाहकाशी हुज्जत घातली. तर, तिच्या मुलाने वाहकाला थेट मारहाणच केली. याप्रकरणी जखमी वाहकाच्या तक्रारीवरून महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता ही योजना लवकर सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पात महिलांना एसटी प्रवासादरम्यान तिकीटाची ५० टक्के रक्कम द्यावी लागेल अशी घोषणा करण्यात आली होती. त्याची जाहिरातबाजी देखील मोठ्या प्रमाणात झाली. यामुळे लगेचच हा नियम लागू झाला असे अनेकांना वाटले.

असे असताना घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणांना जीआर मिळणे आवश्यक असते. परंतु, प्रक्रियेची माहिती नसलेल्या पण सरकारने जाहीर केलेल्या घोषणेची माहिती मिळाल्याने महिलेने एस टी कंडक्टर सोबत सध्या तिकिटासाठी बसमध्येच हुज्जत घातली.

यामुळे हे प्रकरण चांगलेच गाजले आहे. या महिलेचे नाव सविता पोपट माने असे आहे. लातूरमध्ये ही घटना घडली आहे. महिलांना हाफ तिकीट झालंय म्हणत त्यांनी वाद घालायला सुरुवात केली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts