अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news :-दैनिक ‘लोकमत’च्या वतीने पत्रकारितेत नवे मापदंड निर्माण करणाऱ्या पत्रकारांचा ‘पत्रकारिता पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.
यामध्ये सोशल माध्यमांसाठीचा पुरस्कार ‘थोडक्यात’ला प्रदान करण्यात आला. ‘थोडक्यात’चे संस्थापक कृष्णा सुनील वर्पे यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
पुण्यातील JW Marriott हॅाटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, लोकमत संपादकीय मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा,
एमआयटीचे अध्यक्ष विश्वनाथ कराड, दै. तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर, लोकमतचे संपादक विजय बाविस्कर, पुणे लोकमतचे संपादक संजय आवटे उपस्थित होते.
‘थोडक्यात’ हे मराठीमधील पहिलं स्वतंत्र न्यूज पोर्टल आहे. सर्व सोशल मीडिया माध्यमांवर मिळून थोडक्यातचे २८ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.
कमीत कमी शब्दात बातम्या देणारं न्यूज पोर्टल अशी ‘थोडक्यात’ची खासियत आहे. कृष्णा वर्पे यांनी एबीपी माझा चॅनेलमधील नोकरी सोडून या पोर्टलची सुरुवात केली, त्यानंतर अल्पावधीतच हे पोर्टल लोकप्रिय ठरलं.
लोकमतकडून ‘थोडक्यात’सह पुण्यनगरीचे अमोल काकडे, सामनाचे सुदीप डांगे, लोकसत्ताचे अभिजित बेल्हेकर, लोकमतचे तन्मय ठोंबरे, झी 24 तासचे अरुण मेहेत्रे,
एबीपी माझाचे मिकी घई, टीव्ही 9 मराठीच्या अश्विनी सातव-डोके, न्यूज 18 लोकमतचे वैभव सोनवणे, इंडी जर्नलचे प्रथमेश पाटील यांना देखील सन्मानित करण्यात आला.द
रम्यान, एका माध्यम समूहाने इतर माध्यम समूहातील पत्रकारांना गौरवनं ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना कौतुकाची थाप मोठी प्रेरणा देते. त्यामुळे लोकमतच्या या कल्पनेचं चांगलंच कौतुक होत आहे.