महाराष्ट्र

Good News : साठे महामंडळाची थेट कर्ज योजना सुरू

Good News : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मातंग समाज व त्यातील १२ पोटजातीतील नागरिकांच्या आर्थिक विकासाकरता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाने थेट कर्ज योजना जाहीर केली आहे.

मातंग समाजाला स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षाकरता नियमानुसार आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यास प्रत्येकी १ लाख रुपये कर्ज स्वरूपात देण्यात येणार आहे. मुंबई शहर व उपनगर परिसरातील मांग,

मातंग, मिनी मादिंग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मदारी, मादगी या जातीतील उमेदवार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. याकरता अर्जदारांनी २० जुलै २०२३ ते ५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत जिल्हा कार्यालय,

मुंबई शहर-उपनगर, गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, रूम नं. ३३, बांद्रा (पूर्व), मुंबई – ५१ या पत्त्यावर संपर्क साधावा, अशी माहिती साठे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Good News

Recent Posts