अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- वैद्यकीय मशिनरीसाठीच्या बोगस कर्जप्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नीलेश विश्वास शेळके याचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला आहे.या प्रकरणाकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
न्यायमूर्ती एन. व्ही. रामन्ना, विनीत सरन व व्ही. रामासुब्रमन्यन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. येथील शहर सहकारी बँकेतून वैद्यकीय मशिनरीसाठी साडेसतरा कोटी रुपयांचे बोगस कर्ज प्रकरण केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने डॉ. शेळके याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यानंतर डॉ. शेळके याने सर्वोच्च न्यायालयात अॅड. आनंद लांडगे यांच्यामार्फत धाव घेतली. त्या अर्जावर सोमवारी दुपारी सुनावणी झाली.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर डॉ. नीलेश शेळके याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. सर्वोच्च न्यायालयाने डॉ. शेळके याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे त्याच्यासमोर पोलिसांसमोर शरण येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
Web Title – Dr. Shelk’s arrest warrant rejected