Mhada Lottery 2024:- मुंबई किंवा पुण्यासारख्या तसेच इतर मोठ्या शहरांमध्ये स्वतःचे हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता असते.
कारण मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरांमध्ये असो की इतर शहरांमध्ये घर आणि जागांच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे प्रत्येकाला आता घर घेणे किंवा बांधणे शक्य होत नाही. परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा आणि सिडको सारख्या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून खूप मोठे सहकार्य लाभते.
कारण आपल्याला माहिती आहे की, या दोन्ही गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून मुंबई किंवा पुणे सारख्या शहरांमध्ये घरांची लॉटरी काढण्यात येते. अगदी याच पद्धतीने मुंबईमध्ये म्हाडाच्या माध्यमातून 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आलेली असून त्यासाठीचे अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
कसा कराल म्हाडाच्या घरांसाठी अर्ज?
तुम्हाला देखील म्हाडाच्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या या लॉटरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही तो अर्ज IHLMS 2.0 या अँड्रॉइड एप्लीकेशनच्या माध्यमातून करू शकतात व हे ॲप्लिकेशन तुम्ही डाऊनलोड करून म्हाडाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या लॉटरीमध्ये सहभागी होऊ शकतात.
त्याप्रमाणेच तुम्ही म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर देखील अर्ज पासून तर अर्जाचा भरणा व पेमेंट प्रक्रिया तुम्ही करू शकता.
अर्ज नोंदणी आणि अर्ज करण्याचे अंतिम मुदत काय आहे?
म्हाडाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या लॉटरी प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करणे गरजेचे आहे व त्याकरिता शेवटची मुदत 4 सप्टेंबर 2024 दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. याव्यतिरिक्त 4 सप्टेंबर 2024 च्या रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत ऑनलाइन ठेवी स्वीकारल्या जाणार आहेत.
तसेच लॉटरीसाठी जे अर्ज मिळतील त्यांची प्रारूप यादी 9 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी सहा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर मसुदा यादी प्रसिद्ध केली जाईल व ही मसुदा यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे आणि हरकती दाखल करण्याची शेवटची मुदत 9 सप्टेंबर 2024 दुपारी बारा वाजेपर्यंत आहे.
स्वीकारण्यात आलेल्या अर्जांची अंतिम यादी 11 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता जाहीर केली जाईल.जे अर्ज प्राप्त होतील त्यांचे संगणकीय रेखाचित्र 13 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येईल.
अर्ज करण्यासाठी ही कागदपत्रे लागतील
म्हाडाच्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या या लॉटरीसाठी अर्जदाराकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, कॅन्सल चेक, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट फोटो, जन्म प्रमाणपत्र आणि अर्जदाराचा संपर्कचा पूर्ण तपशील इत्यादी कागदपत्रे लागतात.
समजून घ्या उत्पन्ननिहाय अर्जदारासाठी असलेल्या श्रेणी
1- अत्यल्प उत्पन्न गट म्हणजेच ईडब्ल्यूएस– या श्रेणीमध्ये वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा सहा लाख रुपये आहे.
2- अल्प उत्पन्न गट म्हणजेच एलआयजी– या श्रेणीमध्ये वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 9 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
3- मध्यम उत्पन्न गट म्हणजेच एमआयजी– वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 12 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
4- उच्च उत्पन्न गट म्हणजेच एचआयजी– वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा याकरिता 12 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवण्यात आलेला आहे.