महाराष्ट्र

महाराष्ट्रासह भारतात दुष्काळ, हवामान विभागाने स्पष्टच सांगितलं !

Maharashtra News : यंदाचा ऑगस्ट देशातील १९०१ सालापासूनचा सर्वात कोरडा महिना आहे. तसेच यंदाचा मान्सून २०१५ नंतर सर्वात कोरडा हंगाम असल्याचे भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

अल निनोमुळे यंदा पाऊस घटला असून यामुळे महाराष्ट्रासह देशावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत.

मान्सूनचा तिसरा महिना संपत आला असून देशातील अनेक राज्यांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही. सध्या ईशान्य भारत वगळता संपूर्ण देशात पावसाने दडी मारली आहे. जून महिन्यात मान्सूनचा हंगाम सुरू झाल्यानंतर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड,

गुजरात, राजस्थान या मोजक्या राज्यांमध्ये सामान्यापेक्षा अधिक पाऊस झाला. सुमारे २१ राज्यांमध्ये पावसाने सरासरीदेखील गाठली नाही. देशातील मान्सूनचे प्रवेशद्वार असलेल्या केरळात यंदा ४८ टक्के कमी पाऊस पडला आहे.

हवामानातील ला निना आणि अल निनो या घटकांवर भारतातील मान्सूनची वाटचाल अवलंबून असते. अल निनामुळे चांगला पाऊस पडतो, तर अल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी होते.

अल निनोचा फटका, पावसाने मारली दडी

हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यात २५४.९ मिमी पाऊस पडला. ऑगस्ट महिन्यात ३२ टक्के कमी पाऊस पडला असून १९०१ सालापासूचा हा सर्वाधिक कोरडा ऑगस्ट ठरला आहे. पर्जन्यमानातील या तुटीसाठी हवामानातील अल निनो घटक कारणीभूत असल्याचे हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांचे म्हणणे आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts