अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- कीर्तनातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील ज्वलंत विषयांवर भाष्य करून अनेकांची मनं जिंकणारे कीर्तनकार म्हणून निवृत्ती इंदुरीकर महाराजांना ओळखले जाते.
त्यांच्या एका कीर्तनातील वक्तव्यास आक्षेप घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अन्य पुरोगामी संघटनांनी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी इंदोरीकर महाराजांची भेट घेतली होती.
आता काल भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी इंदुरीकरांची भेट घेतली. परंतु ही भेट राजकीय असल्याची चर्चा रंगली आहे. कारण नुकतीच माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनीही त्यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली होती.
त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही माजी मंत्री विखे यांनी दिली होती आणि आता खा. सुजय विखे पाटील यांनी अचानक देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली.
विशेष म्हणजे या भेटीची पुसटशीही चर्चा नव्हती. यापूर्वी आ. विखे पाटील यांनी भेट घेतल्यानंतर पुन्हा खा. डॉ. विखे यांनी महाराजांची घेतलेली भेट महत्वाची मानली जात आहे.
याच कारणामुळे या भेटीला राजकीय अंग तर नाही ना? अशी चर्चा रंगली आहे. या भेटीबाबत खा. डॉ. सुजय विखे यांनी ही माझी फक्त सदीच्छा भेट होती असे सांगितले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved