महाराष्ट्र

एकनाथ शिंदे @42 आमदार, आता पुढे काय?

Maharashtra Politics : शिवसेनेचे बंडखोड नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४२ आमदार असल्याचे आज दाखवून दिले. गुवाहाटीमध्ये आमदारांसोबत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत त्याचे फोटो आणि व्हिडिओ जारी केले आहेत. याशिवाय लवकरच आणखी काही आमदार येत असल्याचे सांगून ही संख्या ५० वर जाणार असल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे आता पुढे काय होणार, याची उत्सुकता लागली आहे. सत्ता स्थापनेसाठी १४४ हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे. शिंदे यांचे समर्थक ५० आमदार आणि भाजपचे समर्थक ११४ आमदार असे मिळुन १६४ आमदारांचे बहुमत विधान सभेत सिद्ध करून राज्यात भाजप+शिवसेना (शिंदे गट) असे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहेत.

यासंबंघी शिंदे आपल्या नव्या गटाचे पत्र देतील. त्यानंतर भाजपकडून राज्यपालांकडे दावा केला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. मात्र, यामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारकडून अनेक ठिकाणी कायदेशीर आव्हान दिले जाऊ शकते आणि पेचही निर्माण केले जाऊ शकतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts