Electric Car : देशात मोठ्या प्रमाणात वाहन उत्पादक कंपन्या बाजारात नवनवीन गाड्या लॉन्च करत आहेत. नुकतेच आता बाजारात मारुतीच्या ऑफरोड एसयूव्ही जिमनीच्या लॉन्चिंगची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.
ही कार कंपनी पुढच्या महिन्यात लॉन्च करेल असे मानले जात आहे. दरम्यान, कंपनीने आपल्या पहिल्या ऑफ-रोड एसयूव्ही जिप्सीचे इलेक्ट्रिक मॉडेल सादर केले आहे.
दरम्यान, हे मॉडेल खास भारतीय लष्करासाठी तयार करण्यात आले आहे. हे मॉडेल भारतीय लष्कर, IIT दिल्ली आणि Tadpole Projects नावाच्या स्टार्टअपने एकत्रितपणे तयार केले आहे. आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स (ACC) मध्ये त्याचे प्रदर्शन करण्यात आले.
आम्ही तुम्हाला सांगतो की जिप्सी पहिल्यांदा डिसेंबर 1985 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. त्याच वेळी, 2018 मध्ये त्याचे उत्पादन थांबविण्यात आले.
टॅडपोल प्रकल्प
Tadpole Projects स्टार्टअपने मारुती जिप्सीला इलेक्ट्रिक अवतार देण्यामागे काम केले आहे. हा स्टार्टअप आयआयटी-दिल्ली अंतर्गत उबवला गेला आहे. या स्टार्टअपच्या अधिकृत वेबसाइटनुसार, Tadpole Projects मुख्यत्वे विंटेज कार आणि जिप्सी यांच्याशी संबंधित आहे.
स्टार्टअप जुन्या व्हिन्टेल कार्सचे रीट्रोफिट देखील करते, ज्याद्वारे जुन्या कार सुधारित केल्या जातात आणि नवीन पद्धतीने तयार केल्या जातात. या इलेक्ट्रिक जिप्साचा रंग पांढरा आहे. याला आर्मी लूक देण्यासाठी ग्रीन टचचाही वापर करण्यात आला आहे.
सिंगल चार्जवर 120Km रेंज
मारुती जिप्सी इलेक्ट्रिकच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या डिझाईनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यावर इंडियन आर्मी, इलेक्ट्रिक आणि ईव्ही असे मजकूर लिहिलेले आहेत.
यामध्ये, स्टेपिनी मागील दारावर आहे. त्यावर भारतीय लष्कराचा लोगोही दिसत आहे. यात 30kW चा बॅटरी पॅक आहे. जे एका चार्जवर 120 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. त्याची बॅटरी 6 ते 7 तासांत पूर्ण चार्ज होते. हे मोटरवर 2 वर्षांची वॉरंटी आणि बॅटरीवर 4 वर्षांची वॉरंटी देते.