महाराष्ट्र

Expressway Update: महाराष्ट्रातील ‘हे’ जिल्हे जोडले जाणार समृद्धीला! कृषी व औद्योगिक क्षेत्राचा होईल झपाट्याने विकास, वाचा संपूर्ण रोड मॅप

Expressway Update:- महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा म्हटला जाणारा समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन महत्त्वाच्या शहरादरम्यानचा महत्वाचा महामार्ग असून आतापर्यंत या महामार्गाचे एकूण दोन टप्पे वाहतुकीसाठी खुले करण्यात आलेले आहेत.

समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा महामार्ग असून राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांना आणि ग्रामीण भागाच्या कनेक्टिव्हिटी साठी खूप महत्त्वपूर्ण असा ठरला आहे. यासोबतच या समृद्धी महामार्गाला  इतर महामार्ग कनेक्ट करण्याचे नियोजन सरकारच्या माध्यमातून करण्यात येत असल्यामुळे आणखीन काही जिल्ह्यांना देखील समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी मिळणार

असल्यामुळे सदर जिल्ह्यांना देखील मुंबई आणि नागपूर व इतर जिल्ह्यांना कमीत कमी वेळेत पोहोचता येणे शक्य होणार आहे व प्रवासाच्या दृष्टिकोनातून देखील अशा प्रकारची योजना खूप महत्त्वाची असणार आहे. अगदी याच पद्धतीने समृद्धी महामार्ग राज्यातील तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांना देखील आता जोडला जाणार आहे.

या जिल्ह्यांच्या विकासाला खूप मोठ्या प्रमाणावर हातभार लागण्यास मदत होणार आहे. नेमका समृद्धी महामार्ग आता कोणत्या जिल्ह्यांना जोडला जाणार आहे व त्याचा रोड मॅप नेमका कसा आहे? यासंबंधीची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 समृद्धी महामार्ग जोडला जाणारा आता या तीन जिल्ह्यांना

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आणखी तीन जिल्ह्यांना जोडला जाणार असून समृद्धी महामार्ग नावाचा ॲक्सेस कंट्रोल नागपूर ते मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे हा आता राज्याच्या एका टोकापासून पश्चिमेला मुंबईपासून पूर्वेला गडचिरोली पर्यंत जाणारा पहिला रस्ता ठरणार असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेड

अर्थात एमएसआरडीसीने या महामार्गाला पूर्व महाराष्ट्र द्रुतगती महामार्ग असे नाव दिले असून हा महामार्ग नागपूर जिल्ह्यातून आता गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यापर्यंत जाणार असून या जिल्ह्यांपर्यंत या महामार्गाचा विस्ताराशी संबंधित शासन निर्णय बांधकाम विभागाचे अप्पर सचिव राहुल गिरीबुवा यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे.

याचे गोंदिया आणि गडचिरोली पर्यंतचे संरेखन निश्चित करण्यात आलेले असून सल्लागारांच्या माध्यमातून त्यावर आता काम सुरू आहे. हा रस्ता पूर्ण नवीन असून सध्या नागपूरपासून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती-घुगदूस- राजुरा मार्गे गडचिरोली जिल्ह्यातील नवेगाव( गोर) पर्यंत नेण्याचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे.

 तीन पॅकेजमध्ये होणार हा समृद्धी महामार्ग

हा महामार्ग तीन पॅकेजमध्ये पूर्ण करण्यात येणार असून यातील पॅकेज एक हा नागपूर ते गोंदिया, पॅकेज दोन हा भंडारा ते गडचिरोली आणि पॅकेज तीन हा नागपूर ते चंद्रपूर असा असणार असून यासाठीचा प्रकल्प अहवाल देखील तयार करण्याचे काम आता एमएसआरडीसीच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे.

 कसा असणार हा महामार्ग?

होऊ घातलेला हा महामार्ग समृद्धी एक्सप्रेस वरील वर्धा जिल्ह्याच्या सेलडोह इंटरचेंज वरून भद्रावती- घुगुस ते राजुरा हा मार्ग जोडला जाणार असून त्याच्यापुढे हा हैदराबाद महामार्गावरील गडचिरोली जिल्ह्याच्या नवेगाव मोर पर्यंत पोहोचणार आहे. या महामार्गाचे एकूण लांबी 182.428 किलोमीटरची असून समृद्धीला जोडणारा घुगुस इंटरचेंज ते चंद्रपूर जोड रस्ता 11.969 किमी असा मिळून हा महामार्ग एकूण 194.397 किमी अंतराचा असणार आहे.

 या महामार्गाचा फायदा कसा होईल?

जर आपण गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा विचार केला तर नैसर्गिक खनिज साधन संपत्तीने समृद्ध असलेले हे जिल्हे असून आदिवासी जिल्ह्या म्हणून देखील यांची ओळख आहे. त्यामुळे या ठिकाणी सुविधांचा विकास आणि  मुंबई व नागपूर व राज्यातील  इतर भागांशी चांगली कनेक्टिव्हिटी मिळण्याच्या दृष्टिकोनातून या महामार्गाचे महत्व अनन्यसाधारण असे असणार आहे.

तसेच गोंदिया व गडचिरोली सारख्या जिल्ह्यांमध्ये कृषी आणि औद्योगिक विकासाला व त्या ठिकाणी उत्पादित होणाऱ्या उत्पादनाला देखील यामुळे चालना मिळण्यास मदत होणार आहे.

तसेच गडचिरोलीचा विचार केला तर या ठिकाणी स्पंज आयर्न मुबलक प्रमाणात उपलब्ध असून या प्रकल्पामुळे होणारी वाहतूक आता या जिल्ह्यातील व राज्यातील इतर भागातील कृषी व औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा देणारी ठरवू शकणार आहे.

Ajay Patil

Recent Posts