आता गणपती उत्सव तोंडावर आलाय. गणपती उत्सव महाराष्ट्रासाठी एक मोठा उत्सव असतो. मुंबई, कोल्हापूर, पुणे आदी भागात तर विशेष आरास केली जाते. शेकडो गणेश मंडळे या उत्सवात सहभागी होत असत.
प्रत्येक मंडळाची एक विशेष खासियत असते. आता एका मंडळाचा गणपती बाप्पा ६६ किलो सोने, ३२५ किलो चांदीचा आहे. विशेष म्हणजे ४०० कोटी ५८ लाखांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे.
हा गणपती आहे देशातील सर्वांत श्रीमंत गणेशोत्सवांमधील एक असलेल्या किंग्ज सर्कल येथील जीएसबी मंडळाचा. गणेशभक्तांसाठी यंदा ५ सप्टेंबरला गणपतीचा दर्शन सोहळा आयोजित केला आहे.
गणेशभक्त आणि सेवादार यांनी दान केलेल्या सोने, चांदी व अन्य वस्तूंपासून गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे, अशी माहिती जीएसबी सेवा मंडळाचे अध्यक्ष अमित डी. पै यांनी दिली.
मंडळाने मागील वर्ष विक्रमी ३६०.४० कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेतले होते. यंदा हा रेकॉर्ड तोडत मंडळाने ४००.५८ कोटींचे गणेशोत्सव विमा संरक्षण घेतले आहे.
….असे आहे विमा संरक्षण :
४३.१५ कोटी: सोने, चांदी आणि दागिन्यांचा समावेश असलेल्या विविध जोखमींचा समावेश आहे.
२ कोटी : आग, भूकंपाच्या जोखमीसह फर्निचर, फिक्स्चर आणि फिटिंग्ज, कॉम्प्युटर, सीसीटीव्ही कॅमेरे, क्यूआर स्कॅनर, भांडी, किराणा, फळे आणि भाजीपाला यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे.
३० कोटी: पेंडॉल, स्टेडियम, भक्त, आदींचा समावेश आहे.
३२५ कोटी : स्वयंसेवक, स्वयंपाकी, गाड्या, चप्पल स्टॉल कामगार, वॉलेट पार्किंग व्यक्ती, सुरक्षारक्षक, आदींसाठी वैयक्तिक अपघात विमा संरक्षण.
४३ लाख : स्थळ परिसरासाठी आग आणि विशेष धोका धोरण