मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवतीर्थावर जात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. गुरूपौर्णिमेदिवशीच फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होणार होती. मात्र पावसामुळे ही भेट होऊ शकली नाही. यावेळी त्यांनी दीड तास चर्चा केली. दोघांनी काही वेळ अँटिचेंबरमध्येही चर्चा केली. यावेळी मनसे आणि भाजप नेतेही उपस्थित होते.
फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळी राज ठाकरेंनी कौतुक करणारे पत्र लिहिले होते. ही सदिच्छा भेट सांगितली जात असली, तरी या दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली आहे.
बहुमत चाचणीमध्ये मनसेच्या एकमेव आमदाराने भाजपच्या बाजूने मतदान केलं होतं. त्यामुळे मनसे आता भाजपसोबत जाणार का? आज फडणवीस-राज ठाकरेंच्या दीड तासाच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असेल? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.