महाराष्ट्र

Farmers Fertilizer : शेतकऱ्यांना आता जात बघून खत मिळणार? खत घेताना जात विचारली जातेय, विरोधक आक्रमक..

Farmers Fertilizer : सांगलीमध्ये शेतकऱ्यांना खत घेताना त्यांची जात विचारली जात असल्याचा प्रकार समोर आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आधीच खतांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत असताना हा एक नवीन प्रकार समोर आला आहे. यामुळे राज्य सरकारवर टीका केली जात आहे.

या घटनेनंतर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष
जयंत पाटील यांनी हा अतिशय धक्कादायक प्रकार असल्याचे म्हणत निषेध केला. यामुळे याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.

ते म्हणाले, यामुळे समाजात जातीभेद वाढेल. खत हवं असेल तर जात सांगा हा प्रकार सांगलीपुरता मर्यादित असेल, असं मला वाटत नाही. हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात आणि कदाचित देशातही असेल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

अशाप्रकारे शेतकऱ्याला त्याची जात विचारून मग खत देणे हे अतिशय धक्कादायक आहे. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.

दरम्यान, अशाप्रकारे प्रत्येक कामासाठी जात विचारणं सर्व सरकारी योजनांमध्ये सुरू होईल. त्यामुळे समाजातील जातीभेद आणखी वाढेल. यामुळे याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. याचं भान सरकारने ठेवलं पाहिजे.

सरकारने असे प्रकार ताबोडतोब बंद केले पाहिजे, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. या घटनेनंतर माध्यमातून याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. यामुळे आता याला सरकारकडून काय उत्तर दिले जाणार हे लवकरच समजेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts