Dhangar Reservation : चौंडी येथे उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनवर व सुरेश बंडगर है गेल्या वीस दिवसांपासून चक्क मरणाच्या दारात उभे आहेत. मात्र तरी देखील राज्य सरकार याची दखल घेत नाही, या पेक्षा दुर्दैव काय आहे.
त्यामुळे सरकारचा महाराष्ट्रात चाललेला चक्का थांबुन चक्काजाम केल्याशिवाय राज्यसरकार जाम होणार नाही. असे मत यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी व्यक्त केले.
पुढे ते म्हणाले की, मंबईत जाऊन देखील धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत हातीच काही लागत नाही. त्यामुळे मंबई किंवा दिल्ली या ठिकाणी चर्चा होणार नाही. जी काही चर्चा होईल ती चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चरणीच होईल.
रात्रीपासुन दोन्ही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. दोन्ही उपोषणकर्ते दवाखान्यात उपचार घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दोन अॅम्बुलन्स व पंधरा डॉक्टरांची टीम उपोषणकर्त्यांच्या देखरेखीसाठी पाठवली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील फोनवरुन उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. त्यांना देखील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. राज्य सरकारने देखील लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा महाराष्ट्रातील धनगर बांधव दोन दिवसात महाराष्ट्रात चक्काजाम केल्याशिवाय रहाणार नाही. असा इशारा बाळासाहेब दोडतले यांनी दिला आहे.
सोमवारी (दि. २५) चौंडी येथील उपोषणस्थळी बदलापूरचे आमदार नारायण कुचे, आ. प्रा. राम शिंदे, माजी जि.प. अध्यक्ष नानासाहेब पाटील देवकाते, शिरूरच्या माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे, अदित्य फत्तेपुरकर (पंढरपूर), परमेश्वर कोळेकर, शालिमार कोळेकर यांच्या सह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातुन व तालुक्यातून धनगर बांधवांनी येऊन पाठिंबा दिला.
यावेळी प्रदेश अध्यक्ष माणिकराव दांगडे (बारामती), अक्षय शिंदे (चौंडी) गोविंद नरवटे (लातुर), समाधान पाटील (जळगाव), महासचिव नितीन धायगुडे ( नातेपुते), किरण धालपे (इंदापुर), बाळा गायके (गंगाखेड) मुन्ना गडदे (बीड), चौंडीचे सरपंच सुनील उबाळे, मोहन गडदे, संतोष कुरडुले यांच्यासह धनगर बांधव उपस्थित होते.