अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून या दुर्गम भागात कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती.
मात्र वैद्यकीय अधिकारी तसेच सेवा सुविधांअभावी हे कोविड सेंटर सुरु होऊ शकत नाही अशी माहिती प्रशासनाने दिली होती. मात्र आता याच कोविड सेंटर बाबत माजी आमदारांनी तहसीलदारांना पत्र दिले आहे.
तसेच आमदार पिचड म्हणाले कि, मी कोविड सेंटर उभे करतो, प्रशासनाने आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, स्वच्छता कर्मचारी, औषधोपचार आदी सुविधा द्यावी.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सध्या दोनच कोविड सेंटर सुरू आहेत. त्यापैकी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या अगस्ति सह साखर कारखान्याने 100 बेड्सचे कोविड सेंटर सुरू असून
खानापूर येथे एक कोविड सेंटर सुरू आहे. दरम्यान माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या प्रयत्नांने तालुक्यात अजून एक 50 बेड्सचे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी काही दाते व समाजसेवी संघटना पुढे येण्यास तयार आहेत.
तरी प्रशासनाने या कोविड सेंटरसाठी आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, कंपाउंडर, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा यंत्रणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved