महाराष्ट्र

Ganeshotsav 2023 : गणपती बाप्पा उशिरा येणार ! यावर्षी असे काही होणार…

Ganeshotsav 2023 : गणेशभक्त दरवर्षीच गणपतीची आतुरतेने वाट बघत असतात. यंदा गणपती १९ दिवसांनी उशिरा येणार असला तरी आतापासूनच गणेश भक्तांना गणपतीचे वेध लागले आहेत.

अधिक मास असल्याने श्रावण, भाद्रपद, अश्विन मासातील सर्वच सण एक महिन्याने उशिरा येणार आहेत गणपती बाप्पाचे आगमन एक महिना उशिरा होणार असले तरी आमची तयारी नेहमीप्रमाणेच आहे. पेण येथून गणपती मूर्ती नेहमीप्रमाणेच आलेल्या आहेत.

मूर्तीना रंग देण्याचे कामही सुरूच आहे. मजूर आणि वाहतूक खर्च वाढल्याने यंदा ५ ते १० टक्के मूर्तीच्या किमती वाढल्या आहेत. यंदा अधिक मास आल्याने गणपती बाप्पाचे आगमन १९ दिवस उशिराने होणार आहे.

यंदाच्या वर्षी श्रावण महिन्यात अधिक मास आला आहे. अधिक श्रावण, निज श्रावण आणि त्यानंतर भाद्रपद महिना असेल. त्यामुळे विविध सण, उत्सव नेहमीपेक्षा २० ते २२ दिवस लांबणीवर गेले आहेत. लाडक्या गणरायाचे आगमनही लांबणीवर पडले असल्याने बाप्पाच्या भक्तांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

यंदा १९ दिवस लांबणीवर

अधिक मासामुळे सण आणि उत्सवांचा कालावधी लांबणीवर पडतो. यंदा विविध सणांसह गणेशोत्सव लांबणीवर पडणार आहे. १९ सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे.

१८ जुलैपासून अधिक मास

दर दिवशी काही प्रमाणात तिथी घटत असल्याने दर तिसऱ्या वर्षी मराठी वर्षामध्ये अधिक मास येतो यंदा १८ जुलैपासून अधिक मासाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे गणपती बाप्पाच्या आगमनाचा कालावधी लांबला आहे

१९ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन होणार

अधिकमासामुळे १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे आगमन होऊन दहा दिवसांचा मुक्काम सहणार आहे.

२८ सप्टेंबरला विसर्जन

२८ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असल्यामुळे त्याच दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. गणेशोत्सवाला उशिरा सुरुवात होणार आहे.

मूर्तिकार लागले तयारीला

गणेशोत्सव लांबणीवर असला तरी मूर्तिकारांकडून गणेश मूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण भागातही गणेश मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. मूर्तिकार मात्र गणपती मूर्ती तयार करण्याच्या कामालाच प्राधान्य देत असल्याचे बघावयास मिळते

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts