महाराष्ट्र

Goa Election Results 2022 : विजयानंतर प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया, केला असा दावा..

Goa Election Results 2022 : गोवा हे अगदी छोटं राज्य असले आणि तिथे केवळ ४० जागांसाठी विधानसभा निवडणूक (Assembly elections) झाली असली तरी हे राज्य अतिशय महत्त्वाचं मानलं जाते.

गोव्यामध्ये भाजपने (Bjp) आघाडी घेतली असली तरी काँग्रेसने (Congress) मात्र मोठी झुंज दिल्याचे पाहायला मिळत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) विजयी झाले आहेत मात्र त्यांना हा विजय सहज मिळालेला नाही.

साखळी मतदारसंघातून प्रमोद सावंत यांनी काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी (Dharmesh Saglani) यांना पराभवाची धूळ चारली आहे. प्रमोद सावंत यांना काठावर पास मते मिळाली असल्याचे चित्र दिसत आहे.

यावेळी गोव्यामध्ये भाजप सध्या १८ जागांवर आघाडीवर असून मोठा पक्ष म्हणून सध्या समोर आला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला १२, टीएमसी आणि मित्रपक्षांना ३, तर आपला तीन जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसत आहे.

यावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रतिक्रिया देत गोव्यात भाजपच सरकार स्थापन करेल असा दावा त्यांनी केला आहे. तसेच आम्ही महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष (मगोप) आणि अपक्षांना सोबत घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Renuka Pawar

Recent Posts