Gold Price Today : जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करणार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये सध्या सातत्याने चढ-उतार होत आहेत.
त्यामुळे राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात 280 रुपयांची वाढ झाली आहे. गुड्स रिटर्नमधून मिळालेल्या माहितीनुसार, आज तुम्हाला 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति दहा ग्रॅम 56,950 रुपये मोजावे लागतील, तर 24 कॅरेट सोन्यासाठी तुम्हाला 62,130 रुपये मोजावे लागतील.
चांदीच्या किंमतीत घसरण
त्याच वेळी, जागतिक बाजारात चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर आज चांदीच्या दरात घसरण दिसून आली. गुड्स रिटर्नमधून मिळालेल्या माहितीनुसार, आज तुम्हाला 1 किलो चांदी खरेदी करण्यासाठी 78,000 रुपये मोजावे लागतील. काल चांदीची किंमत 78,100 रुपये होती म्हणजेच आजची किंमत 100 रुपयांनी घसरली आहे.
mcx फ्युचर्स मार्केट स्थिती
आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारांदरम्यान, आज देशांतर्गत वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या भावातही वाढ दिसून आली. आज एमसीएक्सवर सोन्याचा जून फ्युचर्स 483 रुपयांच्या वाढीसह 61,410 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करताना दिसत आहे. त्याचवेळी चांदीचा जुलै वायदा 376 रुपयांच्या वाढीसह 77,555 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
अशा प्रकारे सोन्याची शुद्धता तपासायची
आता आपण घरी बसूनही सोन्याची शुद्धता तपासू शकता, यासाठी सरकारने ‘BIS केअर अॅप’ नावाचे अॅप तयार केले आहे. या अॅपच्या मदतीने ग्राहक घरी बसून सोन्याची शुद्धता तपासू शकतात. दुसरीकडे, ग्राहकाची काही तक्रार असेल तर तो या अॅपच्या मदतीने करू शकतो.