महाराष्ट्र

Good News : महाराष्ट्रातील शिक्षक भरतीसाठी मुलाखती सुरू

Good News :  राज्यातील शिक्षक भरतीवरील बंदी उठवल्यानंतर, भरतीप्रक्रियेला आता वेग आला आहे. राज्यातील १९६ व्यवस्थापनांतील ७६३ रिक्त पदांसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे निवड करण्यासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

त्यानुसार, मंगळवार, १८ जुलैपासून मुलाखती सुरू होणार आहेत. एका जागेकरता १:१० या मर्यादेत उमेदवार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी – २०१७ नुसार ‘पवित्र पोर्टल’ मार्फत यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांतील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खासगी शैक्षणिक संस्थांसाठी मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या खासगी संस्थांमधील मुलाखतीसह पदभरतीसाठीची कार्यवाही करण्यात आली आहे.

शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९६ व्यवस्थापनांतील ७६३ रिक्त पदांसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे निवड करण्यासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

मुलाखतीसह पदभरतीमध्ये एसईबीसी प्रवर्गासाठी जागा असणाऱ्या व्यवस्थापनांपैकी ज्या व्यवस्थापनांकडे जाहिरातीमध्ये खुल्या (समांतर आरक्षणाशिवाय) प्रवर्गासाठी जागा नाहीत, अशा उर्वरित १९६ व्यवस्थापनांसाठी (एसईबीसी) प्रवर्गासाठीच्या जागा योग्य त्या प्रवर्गामध्ये घेऊन पात्र उमेदवाराकडून नव्याने प्राधान्यक्रम घेण्यात आले आहेत.

आता या १९६ व्यवस्थापनांसाठी मुलाखतीसह पदभरतीकरता ७६३ पदांवर निवडीसाठी अध्यापन व कौशल्यासाठी उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे. मुलाखतीसह पदभरतीमध्ये उर्वरित १९६ व्यवस्थापनांतील इयत्ता सहावी ते इयत्ता बारावी गटातील रिक्त पदांसाठी कार्यवाही करण्यात येत आहे.

या व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी यापूर्वीच्या तरतुदीनुसार, एका जागेकरता १:१० या मर्यादेत (समांतर आरक्षणासह व उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादेत) उमेदवार उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

त्यासाठी ७६३ पदांवर निवडीसाठी एकूण ५,५३५ प्राधान्यक्रमावर उमेदवार शिफारस झाली आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्याबाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांकडून १८ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत करण्यात येईल.

उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण ३० गुण असतील. उमेदवारांची अंतिम निवड या ३० गुणांच्या आधारे व्यवस्थापनाकडून मुलाखतीसाठी शिफारस केलेला गट, विषय व आरक्षण विचारात घेऊन केली जाईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Good News

Recent Posts