गोपीचंद पडळकर पुन्हा बरळले म्हणाले … तेव्हा अन्याय अत्याचार वाढतात !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  राज्यात जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस चा गृहमंत्री होतो तेव्हा अन्याय अत्याचार वाढतात. अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

काल मंगळवेढ्यातील अमानुष मारहाण झालेल्या व्यक्तीची आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट घेतली.

मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी गावातील दामाजी बरकडे यांना मुलाने आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणुन अमानुष मारहाण केली होती.

या घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त झाला. आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाळवणी गावात जाऊन मारहाण झालेल्या बरकडे यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.

आंतरजातीय प्रेमविवाहातून जरी हा प्रकार झाला असला तरी याला कोणीही जातीय रंग देऊन जातीय तेढ निर्माण होईल अस कृत्य करू नका असे आवाहन आमदार पडळकर यांनी केले.

राज्यात जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस चा गृहमंत्री होतो तेव्हा तेव्हा राज्यात अन्याय अत्याचार वाढतात. अशी टीकाही पडळकर यांनी केली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts