महाराष्ट्र

पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचे असेही ‘दिवाळी गिफ्ट’

Maharashtra News:गेल्यावर्षीच्या दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी संप केला होता. प्रदीर्घ काळ चाललेला हा संप पुढे चिघळत गेला. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवास्थानी झाला होता.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने ११८ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील सरकारच्या काळात कारवाई करण्यात आलेल्या या कर्मचाऱ्यांना या सरकारकडून जणू दिवाळी गिफ्टच मिळाले आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण आणि पगारवाढीच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला संप जवळपास सहा महिने सुरु होता.

मागण्या मान्य होत नसल्याने आक्रमक झालेल्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हरओक या निवासस्थानी हल्ला चढवला होता.

पवार यांच्या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आली होती. याप्रकरणी ११८ कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संपकरी आंदोलकांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचं नाव घेतलं होतं.

यानंतर सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी ११८ संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश दिले होते. आता या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात येणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts