महाराष्ट्र

MSRTC News : सरकार एसटी महामंडळाला देणार ३३४.५२ कोटी

MSRTC News : एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवास करण्यासाठी विविध सवलती सरकार देत आहे. जून महिन्यातील या सवलतींच्या परिपूर्तीसाठी राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला ३३४.५२ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. राज्य गृहविभागाने यासंदर्भातील शासन निर्णय मंगळवारी जारी केला आहे.

राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर येताच एसटी प्रवाशांना अनेक सवलती देण्यात आल्या. एसटी बसमधून महिलांना तिकीट ५० टक्के दरात सवलत, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा दिली.

एसटी महामंडळाचा आर्थिक डोलारा डळमळीत असताना या सवलतींचा अतिरिक्त भार पडला. महामंडळावर हा भार पडू नये, म्हणून सवलतींच्या परिपूर्तीसाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येत आहे.

त्यानुसार जून महिन्यातील सवलतींच्या मूल्याकरता प्रतिपूर्ती पोटी ३३४.५२ कोटी इतका निधी राज्य सरकारने वितरित करावा, अशी मागणी महामंडळाने केली होती. सरकारला त्या संदर्भातील लेखी पत्रव्यवहार करण्यात आला.

सरकारने त्यानुसार ३३४ कोटी ५२ लाखांचा निधी रोखीने प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. गृहविभागाने त्याचा शासन निर्णय जारी केला असून आर्थिक खाईत असलेल्या महामंडळाला त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: MSRTC News

Recent Posts