Havaman Andaj : सध्या हिवाळा ऋतू संपत आला असून आत्तापासूनच उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. अशा वेळी राज्यात देखील मोठ्या प्रमाणात तापमान वाढले असून अनेक भागात उन्हाचा पारा चढलेला आहे.
अशातच आता हवामान विभागाने एक चिंताजनक माहिती दिलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर हवामान विभागाने उद्यापासून पुढील ३ दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे.
म्हणजेच उद्या पासून ४ मार्च पासून ते ७ मार्च या दिवसात राज्यात पावसाची शक्यता असल्याचे यावेळी हवामान विभागाने सांगितले आहे. यामध्ये राज्यातील अनेक भागात माध्यम ते हलका पासून पडू शकतो.
ऐनवेळी हवामानाच्या या बदलामुळे शेतकऱ्यांवर मात्र मोठे संकट आलेले आहे. कारण सध्या राज्यातील मोठ्या प्राणात शेतकऱ्यांच्या शेतात गहू व हरभरा आहे. शेतातून पीक बाहेर पडल्यास फक्त काही दिवस राहिले असताना शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा धक्का ठरू शकतो.
यामध्ये जर शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचे संकेत असताना शेतकरी अर्धवट पीक काढून घेत आहेत. दरम्यान, सध्या उन्हाचा चटका वाढला असतानाच राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे.
त्यामुळे राज्यातील काही भागात तुरळक व हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामध्ये मुख्यत्वे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिनांक ४ मार्च ते ६ मार्च दरम्यान विदर्भातील नागपूर, वर्धा, बुलढाणा, अमरावती, वाशीम, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता नागपूर कार्यशाळेकडून वर्तवण्यात आली आहे.