कोठडीतून पळून गेला,आणि मंदिरात जावून लपला.. अखेर पोलिसांनी अटक केलीच !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यातील पोलीस कोठडीतील पळून गेलेला आरोपी प्रविण पोपट गायकवाड यास गुरूवारी पहाटे पाच च्या दरम्यान महादेवाच्या मंदीरातून झोपलेला अवस्थेतच अचानक छापा टाकून ताब्यात घेतले.

मंगळवारी रात्री पारनेर ग्रामीण रूग्णालयातुन पोलिसांच्या हाताला झटका देवुन पळालेला आरोपी प्रविण उर्फ मिठु पोपट गायकवाड याला वडनेर हवेलीच्या डोंगरावरील महादेव मंदिरातुन गुरूवारी पहाटे केली अटक केली आहे.

पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्यामार्गदर्शनाखाली सपोनि विजयकुमार बोत्रे पो.काॅ.भालचंद्र दिवटे सुरज कदम सत्यजित शिंदे, रोकडे, सचिन लोळगे,सचिन देवडे या पोलिस कर्मचारांनी ऑपरेशन कारवाई केली आहे.

आरोपी पळून गेल्यानंतर तो आपल्या मित्रांच्या संपर्कात असल्याची माहिती खबरांच्या माध्यमातून पारनेर पोलिसांना कळाली होती.त्या माहितीच्या आधारे जेरबंद करण्यात आले आहे.

प्रविण याने वडझिरे येथील अल्पवयीन मुलीस ४ मे रोजी पळवून नेले होते त्या मुलीच्या वडीलांनी आज्ञात आरोपीच्या विरोधात ५ मे रोजी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

त्या नंतर पोलीसांनी त्यास शनिवारी अटक केली असून त्यास सात दिवसांची पोलीस कोठडीही न्यायालयाने सुनावली होती,मात्र त्रास होत असल्याने पोलिसांनी

ग्रामीण रूग्णालयात तपासणीसाठी नेले असताना आरोपीने पोलीसांच्या हाताला झटका देत पळून गेला होता.अखेर त्याला पहाटे अटक करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज 
https://www.facebook.com/ahmednagarlive24

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर 
https://twitter.com/Ahmednagarlive

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts