अनेक जिल्ह्यांत मुसळधार ! मुंबईत बिल्डिंग कोसळली, अनेक ठिकाणी आपत्तीजनक परिस्थिती

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईसह विविध ठिकाणी रात्रीपासून मुसळधार पाऊस आहे. दरम्यान या पावसाने अनेक ठिकाणी दुर्घटनाही घडल्यात.

मुंबईत ग्रँट रोड रेल्वे स्थानकाबाहेरील एक इमारत कोसळली आहे. यात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये तर सर्वच शाळा व महाविद्यालये बंद ठेवली गेली आहेत.

मुंबईसाठी यलो, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गसाठी ऑरेंज, तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

मुंबईत इमारत कोसळली
मुंबई मधील ग्रँट रोड रेल्वे स्टेशनबाहेर असणाऱ्या एका इमारतीचा कोसळल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या घटनेत 1 महिला ठार झाली असून 3 जण जखमी झाल्यासच माहिती समजली आहे.

या व्हिडिओमधून या भयंकर अपघाताची कल्पना येते. सध्या मुसळधार पाऊस सुरु असल्याने हा अपघात घडला असल्याची माहिती समजली आहे.

नागपुरात देखील मुसळधार
नागपुरात देखील कोसळधारा सुरु असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागांमध्ये देखील नागरी वस्त्यांत पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. आज शनिवारी मुसळधार पावसामुळे अनेक शाळांना सुट्टी देखील देण्यात आली होती.

नागपूर शहर व जिल्ह्यात 3 तासांत सरासरी 90 मिलिमीटर पाऊस झाला असल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे सध्या अनेक रस्ते बंद झाले आहेत.

तर रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. दरम्यान अजूनही मुंबईसाठी यलो, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गसाठी ऑरेंज, तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts