महाराष्ट्र

Pune Rain News : पुणे शहरासह जिल्ह्यात दमदार पाऊस ! पावसामुळे नागरिक सुखावले

1 year ago

Pune Rain News : पुणे जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असून शुक्रवारी (दि.८) पुणे शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत दमदार पाऊस पडला. दरम्यान, पुढील काही दोन दिवस पुणे व परिसरात यलो अलर्ट दिला आहे. या दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा तर घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पावसाला अनुकूल असलेला कमी दाबाचा पट्टा कार्यरत झाल्यामुळे शहर व जिल्ह्यात पावसाच्या सरी पडत आहे. शुक्रवारी पहाटेपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या.

तसेच, दिवसभर अनेक भागात दमदार पाऊस झाला. पुणे शहरात सकाळपर्यंत १०.५ मि. मि. तर सायंकाळपर्यंत ११.१, पाषाणमध्ये १४.५ मि. मि. तर सायंकाळपर्यंत १३. १, लोहगाव १४.४, एनडीए ११, कोरेगाव पार्क ९, मगरपट्टा ७ तर वडगावशेरीत १०.५ मि.मि. इतका पाऊस पडला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये २२ मि.मि. तर सायंकाळपर्यंत २४ मि.मि., दापोडीत ६ मि. मि. ” इतका पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील निमगिरीत १६६ मि.मि. इतका विक्रमी पाऊस पडला आहे.

तर नारायणगावमध्ये ६९, बल्लाळवाडी ५०.५, खेड ४१.५, राजगुरुनगर २५.५, तळेगाव २३.५, ढमढेरे १८, डुळगाव १७, आंबेगाव १६.५, लवळे १५.५ तर सायंकाळपर्यंत १२ मि. मि., भोर ११.५, लवासा ९.७, दौंड २.५ तर हवेलीत २ मि.मि. पाऊस पडला.

धरणक्षेत्रातही पाऊस पडला आहे. गेले काही दिवस उकाडा वाढला होता. मात्र, झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा तयार झाला आहे. कमाल तापमानात घट झाली आहे.

पावसामुळे नागरिक सुखावले आहेत. आज शनिवार (दि.९) ते १४ सप्टेंबर दरम्यान, आकाश सामान्यतः ढगाळ राहणार असून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Recent Posts