महाराष्ट्र

Highways Update: महाराष्ट्रात होणार ‘हा’ 6 लेनचा नवीन महामार्ग! भूसंपादनाला मिळाली मंजुरी, कोणत्या शहरांना होईल फायदा?

Highways Update:- राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रगत आणि विकसित रस्त्यांचे नेटवर्क असणे खूप गरजेचे असते. या माध्यमातून कृषी तसेच औद्योगिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर चालना मिळते. गतिमान वाहतूक व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्पांची कामे सध्या हाती घेण्यात आलेली आहेत.

यामध्ये अनेक रस्ते प्रकल्प नियोजित असून काही रस्त्यांचे काम सुरू आहेत.याच दृष्टिकोनातून जर आपण मुंबई आणि कोकण या परिसराचा विचार केला तर  कोकण मधील नागरिकांना अनेक कारणाने मुंबईसाठी प्रवास करावा लागतो. मुंबई आणि कोकणचे नाते हे सर्वश्रुत आहे व त्या दृष्टिकोनातून या परिसरामध्ये चांगल्या पायाभूत सुविधा आणि रस्ते असणे देखील तेवढेच गरजेचे आहे.

आता जर तुम्हाला या परिसरामध्ये प्रवास करायचा असेल तर सध्या दोन महामार्ग अस्तित्वात आहेत. परंतु तरीदेखील बऱ्याचदा रस्त्यांचा प्रश्न किंवा वाहतूक कोंडीचा प्रश्न हा निर्माण होत असतो. त्यामुळेच आता या दोन महामार्ग व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तिसरा महामार्ग करण्यात येणार आहे व हा महामार्ग सिंधुदुर्ग कोकण ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे असणार आहे.

 या महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनाला शासनाची मंजुरी

मुंबई सिंधुदुर्ग कोकण ग्रीनफिल्ड हा महामार्ग खूप महत्त्वाचा असणारा असून शासनाच्या माध्यमातून 100 मीटर रुंद एवढी जमीन संपादनाला मंजुरी दिली असून येणाऱ्या काही दिवसात याबाबतचे काम सुरू केले जाणार आहे.

तसे पाहायला गेले तर 2022 मध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला होता. परंतु शासनाने आता भूसंपादनाला मंजुरी दिली असल्यामुळे आता मुंबई सिंधुदुर्ग कोकण ग्रीन फिल्ड एक्सप्रेसवेच्या कामाला गती येईल अशी शक्यता आहे.

 कसा असणार आहे हा महामार्ग?

हा महामार्ग सहा लेनचा असणार असून त्याची लांबी 388.45 किलोमीटर इतकी असणार आहे व हे काम चार टप्प्यांमध्ये पूर्ण केले जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुंबईमध्ये जे काही प्रस्तावित विमानतळ आहे त्या विमानतळाशी हा महामार्ग कनेक्ट केला जाणार असल्यामुळे प्रवाशांना देखील याचा खूप मोठा फायदा मिळेल अशी शक्यता आहे.

या महामार्गावर तुमच्या वाहनांची वेगमर्यादा 100 किलोमीटर प्रतितास इतकी ठेवता येणार आहे.तसेच हा महामार्ग रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या मुख्य जिल्ह्यांना जोडणार आहे. त्यामुळे नक्कीच कोकण ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

Ajay Patil

Recent Posts