Hill Station:- बऱ्याच जणांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये किंवा वीकेंडमध्ये फिरण्याचे हौस असते. कधी कधी मित्रांसोबत तर कधी कुटुंबासोबत काही ट्रिप प्लॅन केले जातात. परंतु जेव्हा अशा ट्रिप प्लॅन केले जातात तेव्हा नेमके कुठे जावे हा प्रश्न सगळ्यांना पडतो. यामध्ये काहीजण दुसरे ठिकाण सुचवतात तर काहीजण वेगळे सुचवतात यामध्ये बऱ्याचदा गोंधळ उडतो.
महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राला निसर्गाने भरभरून दिले असल्याने तुम्ही राज्यातील कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेला तरी देखील तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळ सापडतील. तसेच मुंबई आणि पुण्याच्या दरम्यान जर आपण विचार केला तर अनेक पर्यटन स्थळ या ठिकाणी असून चांगले चांगले आणि प्रसिद्ध असे हिल स्टेशन देखील आहेत.
याच अनुषंगाने जर तुमचा देखील मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत ट्रीप प्लान करून दररोजच्या रुटीनमधून थोडासा शांत आणि निवांत वेळ घालवायचा असेल तर तुम्ही मुंबई आणि पुण्याजवळ असलेल्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकतात. याच अनुषंगाने आपण या लेखात मुंबई व पुण्याजवळील असलेले निसर्ग रम्य पर्यटन स्थळे यांची माहिती घेणार आहोत.
मुंबई जवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळे आणि हिल स्टेशन
1- लोणावळा– लोणावळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असलेली हिरवीगार वनराई असल्यामुळे या ठिकाणी खूप निसर्गरम्य असे दृश्य दिसते. हिरवेगार झाडांनी बहरलेले डोंगराचे दऱ्या, पावसाळ्यामध्ये कडेलोट होऊन कोसळणारे उंच उंच धबधबे यामुळे आपल्या मनाला खूप सुखद अनुभव येतो. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची कधीही गर्दीच असते. पावसाळ्याच्या कालावधीत या ठिकाणी पाऊस अंगावर घेत आणि ढगांच्या ओलसर धुकट वातावरणामध्ये स्वतःला हरवून जाण्यास खूप मजा येते.
2- खंडाळा– कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारे ठिकाण म्हणून खंडाळा ओळखले जाते. मुंबई आणि पुणे व आसपासच्या परिसरातील अनेक तरुण पर्यटक या ठिकाणी ट्रेकिंगचा आनंद घेतात.
खंडाळ्याच्या जवळ ड्युक्स नोज हे एक जवळचे मोठे डोंगर शिखर असून या ठिकाणहून पर्यटकांना खंडाळ्याचा आणि बोर घाटात असलेल्या निसर्ग सौंदर्याचा अनोखा नजारा अनुभवता येतो. या ठिकाणी असलेले टायगर लीप, अमृतांजन पॉईंट तसेच कार्ला असे अनेक पर्यटन स्थळ देखील आहेत.
3- माथेरान– माथेरानला तुम्हाला जायचे असेल तर त्या ठिकाणी जाण्याकरिता रेल्वे आणि बसची सुविधा उपलब्ध आहे. मुंबई ते पुणे या रेल्वे मार्गावर असलेल्या नेरळ या स्थानकावरून उतरून तुम्ही माथेरान पर्यंत छोट्या मीटर गेज रेल्वेने प्रवास करू शकतात. या प्रवासामध्ये तुम्हाला अनेक प्रकारे निसर्ग सौंदर्य अनुभवता येते. या मीटरगेज रेल्वेमधून जात असताना जेव्हा ही गाडी घाटामध्ये वळण घेत जाते तेव्हा निसर्गसौंदर्य न्याहाळताना खूप मजा येते.
4- पाचगणी– पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेले असल्यामुळे त्याला पाचगणी असे म्हटले जात असावे. ज्याप्रमाणे लोणावळा व खंडाळा ही पर्यटन स्थळे एकमेकांपासून अगदी जवळ आहेत अगदी त्याच प्रकारे महाबळेश्वर आणि पाचगणी हे देखील एकमेकांच्या जवळ आहेत.
पाचगणीत असलेले चांगले हवामान आणि निसर्ग संपन्न वातावरण हे पाचगणीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी काळजाचा ठोका चुकेल अशा पद्धतीच्या खोल दऱ्या, धबधबे तसेच कमलगड किल्ला, किडिज पार्क आणि पाचगणीच्या गुंफा ही पर्यटन स्थळ आवर्जून पाहण्यासारखे आहेत.
5- महाबळेश्वर– हे ठिकाण सह्याद्रीच्या पठारावर वसले असून या ठिकाणी महाबळेश्वर मंदिर लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांचा नावाचा व कर्तुत्वाचा ऐतिहासिक वारसा आहे. या ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस होत असल्याने या ठिकाणी सदाबहार निसर्ग सौंदर्य कायमच अनुभवता येते.
या ठिकाणी विल्सन पॉईंट, आर्थर सीट पॉइंट इत्यादी अनेक पॉईंट पाहण्यासारखे आहेत. महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी तसेच रासबेरी आणि लाल रंगाचे मुळे खूप प्रसिद्ध आहेत. एवढेच नाही तर महाबळेश्वर येथील मध खायला खूप चविष्ट आणि प्रसिद्ध असून या ठिकाणचा गुलकंद देखील खूप प्रसिद्ध आहे.
6- इगतपुरी– इगतपुरी हे ठिकाण देखील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असून या परिसरातील धबधबे पावसाळ्यामध्ये पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. साधारणपणे खंडाळा आणि इगतपुरी या दोघ ठिकाणची उंची साधारणपणे 1900 फूट असून ती सारखीच आहे.
जर तुम्हाला इगतपुरीला मुक्काम करायचा असेल तर तुम्ही मुक्काम करून आजूबाजूच्या अप्पर वैतरणा धरण, भंडारदरा तसेच सुंदर नारायण गणेश मंदिर, देवबांध, मदनगड आणि कळसुबाई व रतनगड यासारख्या उत्तुंग डोंगर रांगा देखील पाहू शकतात.
7- माथेरान– माथेरान हे ठिकाण मुंबई पासून 90 किलोमीटर अंतरावर असून हे एक प्रसिद्ध व शांतता प्रिय असेल स्टेशन म्हणून ओळखले जाते. हे पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असून जगातील काही मोजक्या ठिकाणांपैकी एक असून या ठिकाणी वाहन नेण्यास परवानगी नाही. पश्चिम घाटामध्ये समुद्रसपाटीपासून 80 मीटर उंचीवर हे ठिकाण वसलेले आहे.