अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील भूदल सेवेत आसाम मधील तेजपुर येथे सेवा बजावत असणारे भरत लक्ष्मण कदम हे प्रात्यक्षिक करत असताना हृदय विकाराच्या झटक्याने मृत पावले आहेत.
कदम हे २००३ पासून देशसेवेचे व्रत हाती घेऊन आर्मी मध्ये सेवा बजावत होते. ते सध्या आसाम येथे नायक पदावर कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी अचानक भरत यांच्या छातीत दुखू लागले.
त्यानंतर त्यांना जवळच्या आर्मी हॉस्पिटल मध्ये व नंतर दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा अंत्यविधी रविवारी सकाळी ११:३० वाजता पिंपरी जलसेन येथे त्यांच्या मूळ गावी होणार आहे.
नायक भरत कदम हे त्यांच्या 1 वर्षाच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त 2 दिवसात सुट्टीवर गावी येणार होते. सुट्टीवर येण्यापूर्वी छातीत दुखू लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. मुलीच्या पहिल्याच वाढदिवसाला येण्याची त्यांची खूप दिवसांची इच्छा शेवटी अधुरीच राहिली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved