Ahmednagar News : मद्यप्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जास्त दारू पिणे हे शरीरासाठी हानिकारक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. परंतु तुम्हाला हे देखील माहित असेल की दारू पिण्यासाठी परवाना आवश्यक असतो. दारू विकण्यासाठी जसा परवाना लागतो अगदी तसाच दारू पिण्यासाठीही परवान्याची आवश्यकता असते.
विनापरवाना ढाब्यांवर दारू विक्री करणारे, दारू पिणारे यांच्याविरुद्ध पथकांकडून कारवाई केली जाते. दारू विक्रीप्रमाणेच दारू पिण्याचाही परवाना घेणे गरजेचे आहे. विनापरवाना दारू बाळगणे, पिणे कायदेशीर गुन्हा असल्याचे अधिकारी सांगतात. तर दुसरीकडे पाहिले तर वाढत्या कारवाया पाहता दारू पिण्याचे परवाने काढण्याकडे कल वाढला आहे.
अनेकजण ऑनलाइन परवाने काढून घेतात अशी माहिती समोर आली आहे. आता ही माहिती अनेकांना माहित असेल पण हा दारू पिण्यासाठी लागणारा परवाना कसा काढायचा? कोठून काढायचा? त्याला किती खर्च येतो? हे मात्र अनेकांना माहिती नसते. चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सर्वात प्रथम जाणून घेऊयात दारू पिण्याच्या परवान्यासाठी किती खर्च येतो
जर तुम्हाला कायस्वरूपी परवाना काढायचा असेल तर हा परवाना काढण्यासाठी १ हजार ८० रुपये शुल्क भरावा लागेल.
जर तुम्हाला एक वर्षासाठी परवाना काढायचा असेल तर १२० रुपये शुल्क भरावे लागते.
जर तुम्हाला एक दिवसासाठी देशी दारू पिण्याचा परवाना काढायचा असेल तर २ रुपये शुल्क भरावे लागते.
जर तुम्हाला एक दिवसाचा विदेशी दारू पिण्याचा परवाना काढायचा असेल तर ५ रुपयांचे शुल्क भरावे लागते.
परवा कोठे व कसा काढायचा?
दारू पिण्याचा परवाना राज्य उत्पादन शुल्कच्या संकेत स्थळावरून ऑनलाइन काढता येतो. त्याशिवाय शहरी, ग्रामीण भागातील दारू विक्रेतेही दारू पिण्याचा परवाना उपलब्ध करून देतात.